Ad will apear here
Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ


औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अॅड. राम कांडगे उपस्थित होते.

संस्थेचे शिंदे यांनी पदवी ग्रहण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रयत शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालयांमध्ये कर्मवीर विद्या प्रबोधिनीअंतर्गत सुरू झालेले शॉर्टटर्म कोर्स हे एकप्रकारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या ‘कमवा व शिका’ योजनेचाच एक भाग असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.  



कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अॅड. कांडगे म्हणाले, ‘आई-वडील आणि शिक्षक हे  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून शैक्षणिक गुणवत्ता मिळवून आयुष्यात यशस्वी व्हावे.’

या प्रसंगी त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. संस्थेच्या विकासात शरदचंद्र पवार यांनी मोलाची भूमिका निभावल्याचे त्यांनी सांगितले.



महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख करून दिली. तसेच पदवी ग्रहण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ‘रयत शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज शॉर्टटर्म कोर्सचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने महाविद्यालयात कर्मवीर विद्याप्रबोधिनीअंतर्गत ३५ ते ३६ शॉर्टटर्म कोर्स चालविले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्या माध्यमातून त्याला नाविन्यपूर्ण गोष्टी बनविता याव्यात या हेतूने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे,’ असे त्यांनी या प्रसंगी सांगितले.



परीक्षा विभागप्रमुख डॉ. तानाजी हातेकर यांनी आभार मानले. या वेळी उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. नलिनी पाचर्णे, डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. संजय नगरकर  प्रा. बी. एस. पाटील, प्रा. एकनाथ झावरे उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZQLBX
Similar Posts
‘रयत शिक्षण संस्थेमुळे जीवनाचे सोने झाले’ औंध : ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झाले. मी ही त्यातील एक विद्यार्थी असून, माझ्यासारखे हजारो विद्यार्थी झोपडपट्टी परिसरातून शिक्षणासाठी येत होते; मात्र त्यांना प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. अशा वेळेस डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने
पुणे विद्यापीठातील सदस्यांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट औंध : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या नवनियुक्त अभ्यास मंडळ सदस्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला आठ ऑगस्ट रोजी भेट दिली.
औंध येथे तंबाखू निर्मूलन प्रशिक्षण व दंतचिकित्सा शिबिर औंध : येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात तंबाखू निर्मूलन प्रशिक्षण व दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
औंध येथे उद्योजकता विकास कार्यशाळा उत्साहात औंध : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दहा दिवसांची उद्योजकता विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language